Uncategorizedमहाराष्ट्र

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा उपक्रम..!

भोसरी.

भारत देशाचे जागतिक नेतृत्व करणारे आणि तमाम भारतीयांचे लाडके पंतप्रधान मा. श्री.नरेंद्र मोदीजींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भोसरी विधानसभा मतदारसंघात सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत भाजपा शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी यांच्या जीवनपटावर व देशातील विकासात्मक धोरण यावर आधारित documentary film व प्रदर्शनीचे आयोजन भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर दिघी गवळीनगर गव्हाणेवस्ती मंडलच्या वतीने संपन्न झाला. प्रभाग क्रमांक 7 मध्ये पीसीएमटी चौक आणि पीएमटी चौक या दोन ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला.

या प्रसंगी मा.स्थायी समिती अध्यक्ष संतोष अण्णा लोंढे, विजय फुगे, नगरसेवक सागर गवळी, नगरसेविका सोनालीताई गव्हाणे, दत्तात्रय गव्हाणे, कविताताई भोंगाळे, कार्यक्रम संयोजक संजय पटनी, मंडल अध्यक्ष अमोल डोळस, अशोक पठारे, रविंद्र नांदुरकर, रोहिणीताई मांढरे, विजय बुरुंगले व इतर भाजप पदाधिकारी, सहकारी कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!