जीएसटीमध्ये केलेली कपात ही केवळ आर्थिक सुधारणा नाही तर सामान्य माणसाच्या खिशाला दिलासा देणारे आणि व्यापार क्षेत्राला नवसंजीवनी देणारे ऐतिहासिक पाऊल आहे.
पुणे.

देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या सूचनेवरून देशात जीएसटीमध्ये आमूलाग्र बदल करत दरकपात करण्यात आली. जवळपास ९० टक्के जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी आकारणी ही १८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आज लक्ष्मी रस्त्यावर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आयोजित उपक्रमात व्यापारी आणि ग्राहकांशी संवाद साधला.
लक्ष्मी रस्त्यावरील दुकानांमध्ये जात व्यापारी आणि ग्राहकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. जीएसटी दरात कपात केल्याबद्दल व्यापारी संघटनांच्या वतीनं देण्यात आलेली अभिनंदनाचे ठरावही यावेळी स्वीकारले. यावेळी मंत्री मुरलीधर मोहोळ,शहराध्यक्ष श्री.धीरजजी घाटे यांच्यासह शहर भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
जीएसटीमध्ये केलेली कपात ही केवळ आर्थिक सुधारणा नाही तर सामान्य माणसाच्या खिशाला दिलासा देणारे आणि व्यापार क्षेत्राला नवसंजीवनी देणारे ऐतिहासिक पाऊल आहे. मा. मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज देशाची अर्थव्यवस्था नवनवीन उंची गाठत आहे. “Ease of Doing Business” या संकल्पनेला बळ देत व्यापाऱ्यांच्या अडचणी कमी करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे लघु व मध्यम उद्योगांना मोठा हातभार लागणार आहे.
जीएसटीमधील कपात ही गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबं आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी थेट दिलासा आहे. मा. मोदीजींचं नेतृत्व हे केवळ निर्णयक्षम नाही तर दूरदृष्टी दाखवणारं नेतृत्व आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास हा जनसामान्यांच्या हिताला प्राधान्य देत सुरू आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना बचत, व्यापाराला गती आणि रोजगार निर्मितीला चालना मिळणार असून मोदी सरकारच्या सुधारक धोरणांची सातत्यपूर्ण दिशा पुढे सुरू राहणार आहे.




