महाराष्ट्र

सिंहगड रस्ता (पर्वती विधानसभा मतदारसंघ) येथे पार पडले १२ वे ‘खासदार जनसंपर्क सेवा अभियान’!

सिंहगड रस्ता खासदार जनसंपर्क सेवा अभियान.!

पुणेकरांच्या समस्या आणि अडचणी थेट ऐकून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी सुरू केलेल्या ‘खासदार जनसंपर्क सेवा अभियाना’ला आज पर्वती विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. कोथरुड, कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर आणि वडगाव शेरी विधानसभा मतदार संघांनंतर आज पर्वती मतदारसंघात झालेले हे दुसरे तर एकूण बारावे अभियान ठरले. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी दोनदा अभियान यशस्वीरित्या राबविण्यात आले आहे.

सामान्य पुणेकरांची कामे आणि प्रश्न सोडवणे हे लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे. त्यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. सिंहगड रस्ता भागातील कल्पना चावला इंग्रजी माध्यम शाळेत आज झालेल्या अभियानात समाजातील सर्व घटकातील नागरिकांची उपस्थिती आणि सहभाग हे निश्चितच समाधानकारक असून अभियानाचे यश अधोरेखित करणारे आहे.

वैयक्तिक कामे, सार्वजनिक समस्या, नागरी प्रश्न तसेच विकासकामां संदर्भात नव्या कल्पना नागरिकांनी मांडल्या. तातडीने सोडवता येणाऱ्या प्रश्नांवर त्वरित निर्णय घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. उर्वरित मुद्द्यांवर जलद कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले. यावेळी पुणे महापालिका, पोलीस, वाहतूक पोलीस तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नागरिकांच्या सोयीसाठी या अभियानात पुणे महापालिका, राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विविध योजनांचे स्टॉल्स लावण्यात आले होते, ज्याचा लाभ मोठ्या संख्येने नागरिकांनी घेतला. कार्यक्रमाला पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार व राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, आमदार श्री.भीमराव अण्णा तापकीर यांच्यासह भाजपा पुणे शहर तसेच पर्वती विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. हे अभियान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे मुरलीधर मोहोळ यांनी मनःपूर्वक आभार मानले..!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!