E-Paperमहाराष्ट्र

भसे सरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा आणि जीवनप्रवासाचा वेध घेणारा “अमृतयोगी” हा गौरवग्रंथ प्रकाशित..!

मावळ.

आमदार सुनील शेळके म्हणाले की योगविद्येच्या माध्यमातून सर्वांचे आरोग्य चांगले राहावे, मनाचे स्वास्थ्य निरामय राहावे आणि प्रत्येकाचे जीवन आनंदाने बहरून जावे, या निरपेक्ष व प्रामाणिक हेतूने कार्य करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच गुरुवर्य श्री.दत्तात्रय बबन भसे सर.

आजवर सरांनी योगसेवेच्या माध्यमातून १०० पेक्षा अधिक योगशिक्षक आणि २००० हून अधिक योगसाधक घडविले आहेत. योग हे केवळ व्यायाम नव्हे, तर जीवनाचा शुद्ध मार्ग आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून समाजाला दाखवून दिले आहे.

भसे सरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा आणि जीवनप्रवासाचा वेध घेणारा “अमृतयोगी” हा गौरवग्रंथ प्रकाशित होत आहे. हा ग्रंथ त्यांच्या योगसाधनेचा, सामाजिक कार्याचा आणि अध्यात्मिक योगदानाचा प्रेरणादायी दस्तावेज ठरेल.

यावेळी आमदार सुनील शेळके,श्री गुरुवर्य विश्वासजी मंडलिक (कुलगुरु, योगविद्या गुरुकुल, नाशिक), डॉ. सदानंदजी मोरे सर ( अध्यक्ष, साहित्य व संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य), डॉ. रमेशजी पांडव (अध्यक्ष, योग गुरुकुल, नाशिक), ह. भ. प. जालिंदर महाराज मोरे (अध्यक्ष, देहू देवस्थान), सौ. पौर्णिमाताई मंडलिक, ह. भ. प. सचिनदादा पवार तसेच देहू संस्थानचे विश्वस्त इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!