महाराष्ट्र

तळेगाव–चाकण–शिक्रापूर राज्य मार्गावरील खड्यांच्या विरोधात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेले जनआंदोलन मागे..!

तळेगाव.

तळेगाव दाभाडे स्टेशन परिसरातील नागरिकांनी तळेगाव–चाकण–शिक्रापूर राज्य मार्गावरील खड्यांच्या विरोधात मागील दोन दिवसांपासून जनआंदोलन सुरू होते.

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन प्रशासनाला सूचना दिल्या व तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याचे काम सुरु झाले आहे अशी माहिती दिली.

या वेळी आंदोलक चिराग खांडगे,कल्पेश भगत,मिलिंद अच्छुत,सुनील उर्फ मुन्ना मोरे,नितीन फाटककर,नितीन जांभळे,सचिन टकले,सचिन देशपांडे,विशाल वाळुंज,अरुण माने उपस्थित होते.

तसेच माजी राज्यमंत्री बाळा भेगडे,खासदार मा.श्रीरंग(आप्पा) बारणे,मावळ तहसीलदार श्री. विक्रम देशमुख, तळेगाव नगरपालिका मुख्याधिकारी श्री. विजय सरनाईक, श्री. रामदास आप्पा काकडे, शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाऊ खांडभोर, राष्ट्रवादी मावळ तालुका अध्यक्ष श्री. खांडगे, शिवसेना तालुका प्रमुख राम सावंत, युवासेना मावळ तालुका प्रमुख राजेश वाघोले आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!