महाराष्ट्र

मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या विशेष प्रयत्नातून तळेगाव नगरपरिषद अंतर्गत १ कोटी रुपयांच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला..!

तळेगाव.

आज मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. श्री.श्रीरंग आप्पा बारणे यांच्या विशेष प्रयत्नातून तळेगाव नगरपरिषद अंतर्गत १ कोटी रुपयांच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला.

या कामांच्या माध्यमातून तळेगाव शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळणार आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या सुविधा अधिक सुलभ व सोयीस्कर होतील.

यामध्ये गोळवलकर गुरुजी मैदान व उद्यान सुशोभिकरण तसेच अंतर्गत रस्त्यांच्या काॅंक्रिटीकरण कामांचा समावेश आहे.

ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर तळेगावच्या नागरिकांना उत्तम रस्ते, अधिक सुरक्षित प्रवास, हिरवाईने नटलेलं गार्डन आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

यावेळी आमदार सुनील शेळके,श्री.विजयकुमार सरनाईक, श्री.दिपक आण्णा हुलावळे, श्री.राजू‌भाऊ खांड‌भोर, श्री.रामभाऊ सावंत, श्री.निखिल भगत, श्री.सुरेशजी झेंड, श्री.संदिप शिंदे इत्यादी प्रमुख पाहुणे तसेच यशवंतनगर मधील नागरिक उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!