E-Paperमहाराष्ट्र

श्री.विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६ च्या ४० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ संपन्न.

ओझर

श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६ च्या ४० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ संसदरत्न खासदार डॉ.अमोलदादा कोल्हे, आमदार शरददादा सोनवणे, माजी आमदार बाळासाहेब दांगट, भाजप नेत्या आशाताई बुचके, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयशेठ काळे, संचालक माऊलीशेठ खंडागळे आदी मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत आज कारखाना कार्यस्थळी गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला.

यावेळी उपस्थित सभासद, शेतकऱ्यांशी सत्यशील शेरकर यांनी संवाद साधला. नोव्हेंबर महिन्यातही पाऊस चालू आहे. हवामान बदल, अवकाळी पाऊस, इतर पिकातील उत्पादन खर्च वाढ यांसारख्या अनेक आव्हानांना आपला बळीराजा सामोरे जात आहे. अवकाळी पावसाने इतर पिकांचे नुकसान झाले असून उत्पादन आणि उत्पन्न यासाठी एकमेव ऊसाचे पीक आहे.

कारखान्याच्या संचालक मंडळाने नेहमीच शेतकऱ्यांचा हिताचे धोरणात्मक निर्णय घेतले आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाची वेळेवर तोडणी होऊन, येथून पुढच्या काळातही शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य बाजार भाव देण्यासाठी आपला विघ्नहर कारखाना अग्रेसर राहणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कार्यक्षम व्यवस्थापन आणि सभासद शेतकऱ्यांच्या विश्वासाच्या बळावर विघ्नहर कारखान्याने सहकार क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. चालू गळीत हंगामामध्ये १३ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. शेतकी विभागाने ऊस तोडणीचे नियोजन काटेकोरपणे केले असून, गळीत हंगाम यशस्वीतेसाठी शेतकऱ्यांनी आपला ऊस विघ्नहर कारखान्यास घालून सहकार्य करावे अशी विनंती सत्यशील शेरकर यांनी ह्यावेळी केली.

कार्यक्रमादरम्यान, नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन श्री.अनिलतात्या मेहेर यांची भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, केंद्रीय सल्लागार समितीच्या सदस्य पदी तसेच पुणे शहर व जिल्हा शिक्षण संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संचालक मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रसंगी अनिलतात्या मेहेर, शरदराव लेंडे, अनंतराव चौगुले, नंदूकाका शेरकर, राजश्रीताई बोरकर, तान्हाजीशेठ बेनके, अंबादासशेठ हांडे, डॉ.गणपतबाबा डुंबरे, रमेशशेठ भुजबळ, भानूमामा गाढवे, अंकुशशेठ आमले, गुलाबशेठ पारखे, वल्लभ शेळके सर, गणेशभाऊ कवडे, तुषारशेठ थोरात, निवृत्तीशेठ काळे, गंगारामबुवा डुंबरे, बाबाशेठ परदेशी, समीर भगत, प्रमोद खांडगे, बाजीरावशेठ ढोले, धोंडीभाऊ पानसरे, बाजीरावशेठ मानकर, जगनशेठ कवडे, अजितकाका काळे, भगवानशेठ घोलप, मल्हारीदादा नायकोडी, दिलीप डुंबरे, संतोषदादा चव्हाण, प्रियांकाताई शेळके, आत्माराम गाढवे, एकनाथ डोंगरे सर, रंगनाथ पा.घोलप, दिलीपशेठ गांजाळे, सावळेरामदादा पाडेकर, शिवाजीराव चाळक, निलेश बेनके, विविध ग्रामपंचायत संस्थांचे पदाधिकारी, कारखान्याचे आजी माजी संचालक, सभासद, शेतकरी, अधिकारी व कामगार युनियन, सेवक पतसंस्था, सांस्कृतिक मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि सर्व कर्मचारी व कामगार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!