E-Paperक्राइममहाराष्ट्र

प्रेमसंबंधात अडसर ठरणा-या प्रेयसीच्या ६ वर्षाच्या मुलाचा प्रियकराच्या मदतीने निघृण खुन करणा-या फरार आरोपीस दक्षिण महाळुंगे पोलिसांकडून अथक परिश्रमाने अटक..!

महाळुंगे

दक्षिण महाळुंगे पिंपरी चिंचवड: एमआयडीसी पोलीस ठाणे येथे दिनाकं ०८/०४/२०२६ रोजी २७१/२०२६ भारतीय न्याय संहिता चे कलम १०३ (१),२३८,६१ (२), ३ (५) अन्वये ६ वर्षीय मुलाचा खुन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यातील महिला आरोपी नामे बसरिन मेहबुब शेख वय २७ वर्ष रा मु. पो.पुस ता. अंबाजोगाई जि. बीड हिचे फरार आरोपी नामे राम विनायक कजेवाड यावेशी प्रेमसंबंध होते. सदर दोघे हे मुळ रा मु. पो. पुस ता अंबाजोगाई येथे शेजारी राहणेस असुन यातील महिला ही विवाहीत असुन तिस तीन अपत्ये असुन यातील मयत मुलगा नामे आवेज वय ६ वर्ष याचेसह मागील चार महीन्यापुर्वी कुरुळी ता. खेड जि. पुणे येथे तिचा प्रियकर राम कजेवाड याचेसोबत राहणेस आली होती. महिला आरोपी बसरिन शेख व राम कजेवाड यांचे प्रेमसंबंधात महिला आरोपी बसरिन शेख हिचा मुलगा आवेज शेख वय ६ वर्ष हा अडथळा ठरत होता. याच कारणावरुन दिनांक ०४/०४/२०२६ रोजी रात्री २३.३० वा चे सुमारास वरील दोघांनी संगनमत करुन आवेजला बाथरुम मधील पाण्याचे बादलीत डोके बुडवुन आणि त्याचे डोके भिंतीवर व जमीनीवर आपटुन त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. सदर हत्येनंतर गुन्हा लपविण्यासाठी आरोपींनी सदर घटनेला नैसर्गिक मृत्युचे स्वरुप देण्यासाठी आवेजचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाल्याचे बनाव केला. सदर आवेजचा मृतदेह यातील आरोपींनी राम कजेवाड याचे इर्टिगा कारमधुन धर्मापुरी ता. परळी जि. बीड घेउन गेले असता, यातील फिर्यादी इसाक शेख यांना संशय आल्याने त्यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाणे यांना माहीती दिली. सदर बाबत मयत मुलाचे डोक्यावर व पाठीवर मारहाणीचे जखम दिसुन आल्याने व तिचे संशयास्पद हालचालीमुळे व शवविच्छेदन अहवालामुळे सदर महिला आरोपी बसरिन शेख हिचेकडे सखोल चौकशी केली असता, तिने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. सदर प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोस्टे येथे फिर्यादी इसाक शेख रा. बीड यांचे फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल झाला असुन सदर प्रकरणी मयत मुलाची आई बसरिन शेख हिस यापुर्वीच अटक करण्यात आली असून तिचा प्रियकर राम कजेवाड हा फरार होता. सदर आरोपी याचा तिरुपती, आंध्रप्रदेश व अंबाजोगाई जि. बीड येथे पाठलाग करुन त्याचा शोध घेऊन त्यास दिनांक १७/०४/२०२६ अटक करुन त्यास मा. न्यायालयासमोर हजर केले असता त्यास मा. न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त. श्री विनय कुमार चौबे सोो, मा.सह पोलीस आयुक्त, डॉ.महावरकर, मा.अप्पर पोलीस आयुक्त, श्री.सारंग अव्हाड, मा.अप्पर पोलीस आयुक्त, श्री.बसवराज तेली. मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४. श्रीमती श्वेता खेडकर, सहा पोलीस आयुक्त, महाळुंगे विभाग, श्री.सचिन कदम यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. अनिल देवडे, तपास पथकाचे सपोनि पुल्ली, सपोफौ चौधरी, अंमलदार विश्वास नाणेकर, किशोर सांगळे, युवराज बिराजदार, चेतन सावंत, राजेंद्र खेडकर, राजेंद्र गिरी, महेश गायकवाड, राजकुमार हणमंते, प्रशांत कसबे, शिवाजी मरकड केली असुन सदर गुन्हयाचा तपास हा पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये हे करीत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!