महाराष्ट्र
आज घटस्थापनेच्या शुभ दिनानिमित्त श्री वाघजाई देवस्थान नवरात्र उत्सव,खंडाळा येथे आमदार सुनीलअण्णा शेळके यांनी सपत्नीक भेट दिली व सपत्नीक मंदिरामधील घटस्थापना केली.
मावळ पुणे.सोमवार २२ सप्टेंबर २०२५

‘ क ‘ वर्ग तीर्थक्षेत्र मध्ये समाविष्ट या तीर्थक्षेत्र या ठिकाणी पर्यटन विभागाच्या माध्यमातून सुसज्ज भक्तनिवास, स्वच्छतागृह, स्टेज व सभामंडप, स्ट्रीटलाईट, स्वयंपाकगृह आणि दुकाने अशा विविध सोयी-सुविधांचा समावेश असलेला तीर्थक्षेत्र विकास आराखडा सादर करण्यात आला असून लवकरच यास मान्यता प्राप्त होईल असे सुनीलअण्णा शेळके यांनी सांगितले.
तसेच यावेळी श्री वाघजाई देवी मंदिर ट्रस्टचे सर्व संचालक व परिसरातील मान्यवर उपस्थित होते.





