
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून पुण्यात नुकत्याच सुरु झालेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाला भेट देत कामकाजाची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित असलेल्या या कक्षाच्या माध्यमातून अल्पावधीतच १८ कोटींहून अधिकचे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. गरजूंसाठी हे निश्चितच आधाराचं केंद्र ठरत आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.




