महाराष्ट्र

रांका ज्वेलर्स चाकण येथील शाखेचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न..!

चाकण पुणे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत सुनेत्राताई पवार मौजे चाकण–आंबेठाण (ता. खेड) येथील रांका ज्वेलर्सच्या पंधराव्या दालनाच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहिले.

१४६ वर्षांच्या सुवर्ण परंपरेतून रांका ज्वेलर्सचे सोने, चांदी, हिरे, अँटिक व जडाऊमधील नाविन्यपूर्ण दागिन्यांनी सजवलेले हे भव्य दालन चाकण व पंचक्रोशीतील ग्राहकांसाठी पुण्यापर्यंत जाण्याची गरज संपवणार आहे. रांका ज्वेलर्सचे श्री.फतेचंद रांका, श्री.ओमप्रकाश रांका, डॉ.रमेश रांका, श्री.अनिल रांका, श्री.तेजपाल रांका, श्री.वस्तुपाल रांका, श्री.शैलेश रांका, श्री.श्रेयस रांका व संपूर्ण रांका परिवार यांना अजितदादा पवार आणि सुनेत्राताई पवार यांनी नवीन शाखेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या..!

समारंभा दरम्यान आदरणीय अजितदादा पवारांनी राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाची दखल घेत, राज्य शासन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले तसेच केंद्र शासनाकडूनही मदत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. तसेच, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सामाजिक जबाबदारीचे आवाहन करताच रांका परिवाराने रुपये ११ लाखांचा धनादेश दादांकडे सुपूर्द केला,तसेच श्री. कृष्णा ज्ञानेश्वर करंडे यांनी रुपये ५० हजारांचा धनादेश देऊन अतिवृष्टीग्रस्तांना मदत केली. तसेच रांका परिवार आणि श्री.करंडे यांचे सुनेत्रा ताई पवार यांनी मनःपूर्वक आभार मानले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!