चाकण औद्योगिक वसाहती मधील ट्रॅक कॉम्पोनंट लि.व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यात औद्योगिक क्षेत्रातील सर्वात मोठा वेतनवाढ करार..!
चाकण

चाकण औद्योगिक वसाहती मधील ट्रॅक कॉम्पोनंट लि.व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यात औद्योगिक क्षेत्रातील सर्वात मोठा वेतनवाढ करार झाला. कंपनीच्या कामगारांना 14 हजार 100 रुपयांची पगारवाढ मिळाली आहे. त्यामुळे यंदा कंपनीच्या कामगारांची दिवाळी अधिक गोड होणार आहे.

कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यामध्ये चौथ्या वेतनवाढ करार झाला. यावेळी संघटनेचे प्रमुख सल्लागार श्री.रोहिदास गाडे व अध्यक्ष श्री.जीवन येळवंडे उपस्थित होते. करारा वरती संघटनेच्या वतीने सरचिटणीस श्री.कृष्णा रोहोकले, सचिव श्री.रघुनाथ मोरे, खजिनदार श्री.अमृत चौधरी, श्री.भट्टू पाटील, श्री.महादेव येळवंडे, श्री.प्रशांत पाडेकर, श्री.रविंद्र भालेराव, ग्रुपो अंतोलीन युनिट अध्यक्ष श्री.संजय पाटील, ग्रुप अंतोलीन सचिव श्री.महेंद्र कदम, ट्रॅक यूनिट अध्यक्ष श्री.दीपक ब-हाटे, उपाध्यक्ष श्री.मिंटू कुमार, सरचिटणीस श्री.प्रविण वाडेकर, सहचिटणीस श्री.अनिल कुंभार, खजिनदार श्री.सवाई सिंह, व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे CEO श्री.राजेश खन्ना, प्लांट हेड श्री.गिरीश भेंडगावे, एचआर मॅनेजर श्री.अविनाश चोरमले, श्री.जयदीप काटकर यांनी सह्या केल्या आहेत.

प्रास्ताविक एच.आर हेड श्री.अविनाश चोरमले यांनी केले. तसेच, सूत्रसंचालन सौ.पुजा थिगळे यांनी केले. खजिनदार श्री. अमृत चौधरी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. कामगारानी पेढे वाटून फटाक्याची अतिषबाजी करुण आनंद व्यक्त केला.
वेतनवाढ करारामध्ये एकूण पगारवाढ : 14 हजार 100 रुपये. मेडिक्लेम पॉलीसी 150000/- रुपये (एक लाख पन्नास हजार रुपये) संपूर्ण खर्च कंपनी करणा आहे. जादाची 300000 रुपयांची बफर पॉलीसी, या पॉलिसीमध्ये स्वतः पत्नी, मुले यांचा समावेश करण्यात आला आहे. मृत्यू साहाय्य योजना, ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी, सुट्टया : 41, दिवाळी बोनस : 15 हजार 228 रुपये रक्कम बोनस, मासिक हजेरी बक्षीस, सेवा बक्षीस, वैयक्तिक कर्ज सुविधा, गुणवंत कामगार पुरस्कार, प्रत्येक कामगाराला प्रत्येकी १८ महिन्याचा फरक देण्यात येणार आहे. यासह अनेक लाभ कामगारांना होणार आहेत.
कामगार हिताचा निर्णय घेतल्याबद्दल स्वाभिमानी श्रमिक संघटना आणि कंपनी व्यवस्थापनाचे आमदार महेश लांडगे यांनी मन:पूर्वक आभार मानले.!




