महाराष्ट्र

‘जनसंवाद’ कार्यक्रम म्हणजे लोकांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न आहे..! आमदार सुनील शेळके.

देहू.

जनतेच्या अपेक्षा, प्रश्न आणि गरजा समजून घेऊन त्यांचे निराकरण शासनस्तरावर व्हावे, यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. यासाठीच जनतेशी थेट संवाद साधण्याच्या उद्देशाने आज श्री क्षेत्र देहू येथील सरस्वती मंगल कार्यालय, गाथा मंदिर रोड येथे ‘जनसंवाद कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला आहे असे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांनी आपल्या समस्या, तक्रारी आणि सूचना लिखित स्वरूपात सादर केल्या तसेच प्रत्यक्ष संवादातून आपले विचार मांडले.

लोकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणे पार पाडत आहोत.

जनतेच्या अडचणींचे तातडीने निराकरण होण्यासाठी सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी आमदार सुनील शेळके यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!