E-Paperमहाराष्ट्र

शिवजन्मभूमी जुन्नर शहरात नव्याने तयार झालेले ५ बेकायदेशीर कत्तलखाने तातडीने उध्वस्त करण्यात यावेत ..!

जुन्नर

शिवजन्मभूमी जुन्नर शहरात गोमाफियांनी पुन्हा नव्याने ५ बेकायदेशीर कत्तलखाने सुरू करून गोवंशाची निर्दय कत्तल करत आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर असून, जनतेत आणि शिवभक्तांमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली आहे.

या संदर्भात आज जुन्नर येथे शिवशंकर स्वामी यांनी सौ. रासकर मॅडम ( नायब तहसीलदार ), मा. श्री. कोल्हे साहेब ( मुख्याधिकारी, जुन्नर नगरपरिषद ) तसेच जुन्नर पोलीस ठाण्याचे पो.नि. श्री. अवचर साहेब यांची वैयक्तिक भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

बैठकीदरम्यान बेकायदेशीर कत्तलखान्यांचे ठिकाणे , संबंधित पुरावे आणि जबाबदार व्यक्तींची माहिती प्रशासनाला दिली. सदर प्रकरणात तात्काळ कारवाई करून सर्व बेकायदेशीर कत्तलखाने उध्वस्त करण्याची विनंती समस्त जुन्नरकर , शिवभक्त , गोरक्षकांच्या वतीने केली.

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी सदर माहिती गांभीर्याने घेत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच या कत्तलखान्यांवर कठोर कार्यवाही केली जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

गोवंश हत्त्या बंदी कायदा हा महाराष्ट्रात सक्तीने लागू असून, गायीला ‘ राज्यमाता ’ चा दर्जा प्राप्त आहे. त्यामुळे जुन्नरमधील एकही गोवंश कत्तलखान्यात जाणार नाही, यासाठी प्रशासन आणि जनतेने एकत्र येऊन प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे अशी भावना शिवशंकर स्वामी यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!