E-Paperमहाराष्ट्र

बाणेर येथे (कोथरुड विधानसभा) उत्तम प्रतिसादात पार पडले १३ वे ‘खासदार जनसंपर्क सेवा अभियान’!

पुणे.

माऊली गार्ड मंगल कार्यालय, बाणेर | खासदार जनसंपर्क सेवा अभियान पार पडले.

पुणेकर नागरिकांचे प्रश्न, समस्या आणि अडचणी थेट ऐकून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी सुरू केलेल्या ‘खासदार जनसंपर्क सेवा अभियाना’ला आज कोथरुड विधानसभा मतदारसंघात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अभियानाचे पुणे लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातील दोन टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झाले असून आज कोथरुड विधानसभा मतदारसंघातील अभियानाने तिसऱ्या टप्प्याचा प्रारंभ केला. हे सलग १३ वे आणि कोथरुड विधानसभा मतदारसंघातील ३ रे अभियान होते. अशी माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

माध्यमांशी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की सामान्य पुणेकरांची कामे आणि प्रश्न सोडवणे हे लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे. त्यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. बाणेर भागातील माऊली गार्डन मंगल कार्यालयात आज झालेल्या अभियानात समाजातील सर्व घटकातील नागरिकांची उपस्थिती आणि सहभाग हे निश्चितच समाधानकारक असून अभियानाचे यश अधोरेखित करणारे आहे.

वैयक्तिक कामे, सार्वजनिक समस्यांचे विषय, नागरी प्रश्न तसेच विकासकामांसंदर्भात नव्या कल्पना नागरिकांनी मांडल्या. तातडीने सोडवता येणाऱ्या प्रश्नांवर त्वरित निर्णय घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच काही विषयांवर कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले. यावेळी पुणे महापालिका, पोलीस, वाहतूक पोलीस तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नागरिकांच्या सोयीसाठी या अभियानात पुणे महापालिका, राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विविध योजनांचे स्टॉल्स लावण्यात आले होते, ज्याचा लाभ मोठ्या संख्येने नागरिकांनी घेतला. कार्यक्रमाला कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह भाजपा पुणे शहर तसेच कोथरुड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!