E-Paperमहाराष्ट्रराजनीति

माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा भाजपात जाहीर प्रवेश..!

पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पुण्यातील माजी नगरसेवकांनी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष मा.श्री. रविंद्रदादा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी सर्वांचं स्वागत भाजपात स्वागत करत पार्टीत योग्य सन्मान राखला जाईल, असा शब्द प्रवेश करणाऱ्या सर्वांना दिला. मा. मोदीजी आणि मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात सुरु असलेल्या विकासपर्वात नव्याने सहभागी झालेल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक श्री. सचिन दोडके, श्री. सुरेंद्र पठारे, सायलीताई रमेश वांजळे, श्री. बाळाभाऊ धनकवडे, रोहिनीताई चिमटे, श्री. नारायण गलांडे, श्री. प्रणव वसंतराव चव्हाण, श्री. विकासनाना दांगट, श्री. खंडू सतिश लोंढे, डॉ. अमोल देवडेकर, शुभांगी होले, प्रतिभा चोरगे, पायल तुपे, श्री. मामा तुपे, श्री. भूषण बराटे तसेच मुळशी तालुक्यातील पंचायत समितीचे सभापती श्री. भानुदासजी पानसरे, खडकवासल्याचे माजी सरपंच श्री. संतोष मते यांच्यासह अनेक पदाकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला.

प्रवेशावेळी मंत्री मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील, पुणे शहराध्यक्ष श्री.धीरज घाटे, निवडणूक प्रमुख श्री.गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, भाजपा प्रदेश माध्यम प्रमुख श्री.नवनाथजी बन यांच्यासह शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!