दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे हद्दीत तीन वर्षाच्या बालकावर लैंगिक अत्याचार करुन त्याचा अत्यंत क्रूर पध्दतीने खुन करुन फरार झालेल्या विधीसंघर्ष बालकाचा अवघ्या बारा तासात शोध घेउन ताब्यात घेतले.
महाळुंगे चाकण.

महाळुंगे चाकण : दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे येथे दिनाकं ०१/०५/२०२६ रोजी ३५१/२०२६ भारतीय न्याय संहिता चे कलम १०३ (१), २३८, सह पोक्सो कायदा कलम ४,६ अन्वये तीन वर्षीय बालकावरअत्याचार करुन अत्यंत क्रुर पध्दतीने गळा कापुन खुनकेल्याची घटना घडली होती. सदर प्रकरणी घटनेचे गांभीर्य लक्षात घेउन पोलीसांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयात यातील फिगा यांचा मुलगा हा घरासमोर खेळत असताना अचानक गायब झाल्याने यातील फिगाने आजुबाजुस शोध घेऊन पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने सदर मुलाचा पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांनी व्यापक प्रमाणात शोध घेतला असता सदर मुलगा हा तेथील शेजारील रुम मध्ये मयत अवस्थेत बैंग मध्ये आढळुन आला. प्रथम दर्शनी तीन वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार करुन गळा कापुन अत्यंत क्रूरपणे खुन केल्याचे दिसुन आले. सदर घटनेबाबत दक्षिण महाळुंगे पोस्टे गुरनं ३५१/२६ भान्यासं चे कलम १०३ (१), २३८, सह पोक्सो कायदा कलम ४,६ अन्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हा
हा अत्यंत संवेदनशील असल्याने यातील आरोपीचा तात्काळ शोध घेण्याचे पोलीसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. सदर गुन्हयात यातील संशयित आरोपीबाबत माहीती घेतली असता सदर आरोपी हा बिहार येथील रहिवासी असुन तो अल्पवयीन असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदर गुन्हयात पोलीसांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेउन तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तपासादरम्यान दक्षिण महाळुंगे पोलीस ठाणेकडील तपास पथकाने अथक परिश्रम घेउन घटनास्थळाचे बारकाईन परिक्षण केले. सदर गुन्हयात तांत्रिक माहीती, सीसीटिव्ही फुटेज व गोपनीय माहीतीच्या आधारे यातील आरोपीचा माग काढण्यात आला. तपास पथकाने सापळा रचुन सदर अल्पवयीन हा विहार राज्यात पळुन जाण्याचे तयारीत असताना सदर विधीसंघर्षग्रस्त बालकास पुणे रेल्वे स्टेशनचे बाहेरील परिसरातुन ताब्यात घेतले. सदर प्रकरणात विधीसंघर्षग्रस्त बालकास गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली असुन सदर गुन्हयाचे तपासात विधीसंघर्ष ग्रस्त बालकास विधीवत ताब्यात घेण्यात आले. यातील विधीसंघर्षग्रस्त बालकाविरुध्द भारतीय न्याय संहिता अंतर्गत खुन व लैंगिक अत्याचार संबधी गंभीर कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त. श्री विनय कुमार चौबे सो, मा. सह पोलीस आयुक्त डॉ.महावरकर, मा.अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.सारंग आवाड, मा. अप्पर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) श्री.बसवराज तेली, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ श्रीमती श्वेता खेडकर, मा. सहा पोलीस आयुक्त महाळुंगे विभाग श्री. सचिन कदम यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. अनिल देवडे, तपास पथकाचे सपोनि भास्कर पुल्ली, पोउपनि पिंजारी, जायभाये, अंमलदार विश्वास नाणेकर, किशोर सांगळे, चेतन सावंत, गोरख गाडीलकर, शदर खैरे, राजेंद्र खेडकर, राजेश गिरी, महेश गायकवाड, राजकुमार हणमंते, योगेश तिडके, प्रशांत कसबे, शिवाजी मरकड यांचे पथकाने केली असुन सदर गुन्हयाचा तपास हा पोलीस निरीक्षक श्री अनिल देवडे हे करीत आहेत.




