राजकारण
लोकसभा निवडणूक २०२४: नरेंद्र मोदी ३७० जागा जिंकण्याचा दावा या ५ प्रकारच्या आकडेवारीच्या आधारावर करत आहेत का?
लोकसभा चुनाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७० जागा जिंकण्याचा केलेला दावा दोन प्रश्न उपस्थित करतो. पहिला प्रश्न असा की, मोदी विशेषतः ३७० जागा जिंकण्याचा दावा का करत आहेत? दुसरा प्रश्न असा की, २०२४ च्या निवडणुकीत भाजपच्या जागांच्या संख्येत कोठे वाढ होऊ शकते?
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आपल्या सर्व जुन्या विक्रमांना मागे टाकू शकेल का? संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आपला पक्ष ३७० जागा जिंकेल आणि सलग तिसऱ्यांदा सत्तेत परत येईल, असा दावा केल्यानंतर हा विषय संपूर्ण देशात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
